कणकवलीत कोकण इतिहास परिषदेचे १३ वे राष्ट्रीय अधिवेशन….

20
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.०३ : येथील महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी यशस्वी वाटचाली निमित्त कोकण इतिहास परिषदेचे १३ वे राष्ट्रीय अधिवेशन १० फेब्रुवारीला सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कणकवली कॉलेज मध्ये होणार आहे. या अधिवेशनात देशभरातून सुमारे २०० हून अधिक प्रतिनिधी, अभ्यासक सहभागी होणार आहेत.
२ ऑक्टोबरला डॉ. दाऊद दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण इतिहास परिषदेच्या कार्याला ठाणे इथून सुरुवात झाली. कोकण आणि कोकणाशी संबंधित इतिहास संशोधनास चालना मिळावी या हेतूने कोकण इतिहास परिषद कार्यरत असून कोकण इतिहास परिषदेचे कोकणात विविध ठिकाणी आतापर्यंत १२ अधिवेशने पार पडली आहेत. १३व्या अधिवेशनाचे यजमानपद यावर्षी कणकवली महाविद्यालयाने स्वीकारले आहे.
या अधिवेशनात कोकण आणि कोकणशी संबंधित इतिहास, समाजजीवन, संस्कृती, भाषा, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, वाणिज्य ,दळणवळण, परिवहन, पर्या ग्रामीण विकास, स्त्रीवाद, मार्क्सवाद ,आंबेडकरवाद, वंचितांचे इतिहास लेखन तसेच आंतरविद्याशाखीय विषयासंदर्भातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, धार्मिक, भौगोलिक व ऐतिहासिक अशा विविध विषयावरील शोध निबंध सादर करता येणार आहेत. प्राध्यापक व
अभ्यासकांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील शोधनिबंध दिनांक २० जानेवारी २०२४ पर्यंत पाठवावेत (ई- मेल [email protected] )असे आवाहन करण्यात आले आहे.