किन्नरांच्या वेशात पैसे मागणाऱ्या तिघा पुरुषांना पोलिसांचा दणका…

20
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडीतील प्रकार; जबरदस्तीने २५ हजाराची रक्कम मागितली महिलेची तक्रार…

सावंतवाडी,ता.०३: किन्नरांच्या वेशात फिरणाऱ्या तिघा पुरुषांवर आज येथील पोलिसांनी कारवाई केली. आपण किन्नर असल्याचे सांगून एका महिलेच्या घरात शिरून त्यांनी २५ हजाराची मागणी केली होती. यावेळी घाबरून तिने ५ हजार रुपये दिले होते. याबाबतची माहिती पोलीस कर्मचारी प्रवीण वालावलकर यांना दिल्यानंतर त्यांनी त्या तिघांचा शोध घेतला. मात्र तपासणीनंतर ते पुरुष असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
संबंधित तिघे पुरुष हे शहरात किन्नरांचा वेश धारण करून पैसे मागत होते. दरम्यान शहरातील एका इमारतीत त्यांनी एका घरात प्रवेश केला. यावेळी घरात एकट्या असलेल्या महिलेला त्यांनी आपण किन्नर आहोत त्यामुळे २५ हजार रुपये द्या, अशी जबरदस्ती केली. यावेळी घाबरलेल्या त्या महिलेने त्यातील एकाला ५ हजार रुपये गुगल पे ने पाठवले. मात्र झालेला प्रकार रुचला नसल्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलीस कर्मचारी वालावलकर यांना दिली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर त्या तिघांचा तात्काळ शोध घेऊ पोलीस ठाण्यात आणले. मात्र चौकशी अंति ते पुरुष असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले.