विलवडे-वरचीवाडी येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ…

19
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०३: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विलवडे-वरचीवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ प्रमुख गावकरी बाबुराव दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे उपस्थित होते. त्यांनी या रस्त्यासाठी निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी विलवडे सरपंच प्रकाश दळवी, उपसरपंच विनायक दळवी, माजी सभापती कृष्णा दळवी, भालावल उपसरपंच अर्जुन दळवी, मोहन दळवी, संतोष दळवी, ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी, प्रदीप दळवी, संतोष दळवी, भालावल गावचे प्रमुख मानकरी गोविंद परब आदी सर्व मान्यवर उपस्थित होते.