विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम शिक्षकच करू शकतात…

21
2
Google search engine
Google search engine

स्वप्निल प्रभू-आजगावकर; आजगाव येथील प्रशालेत स्नेहसंमेलन उत्साहात….

बांदा,ता.०५: ग्रामीण भागातील पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच भविष्यातील करिअरच्या संधी याबाबत शिक्षकच चांगले मार्गदर्शन करू शकतात, असे प्रतिपादन ॲड. स्वप्निल प्रभू आजगावकर यांनी आरोस येथे केले. विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव या प्रशालेत वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी केले. अहवाल वाचन काव्या साळवी यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. विविध स्पर्धा व परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. स्वप्निल प्रभू आजगावकर, शाळा समिती अध्यक्ष अण्णा झांट्येे, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, नाणोस सरपंच प्राजक्ता शेट्ये, उपसरपंच अमिता नाणोसकर, युवा उद्योजक सागर नाणोसकर, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष अनंत पांढरे, उत्तम सतोस्कर, मदन मुरकर, प्रा. कांबळे, पालक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी परुळेकर तर आभार प्रदर्शन समृद्धी परब यांनी मानले.