सिंधूरत्न योजनेत “नोडल एजन्सी” म्हणून जिल्हा बँकेला संधी द्यावी…

36
2
Google search engine
Google search engine

मनिष दळवींची मागणी; दीपक केसरकरांची बँकेला भेट, पदाधिकाऱ्यांकडून सन्मान…

सिंधुदुर्गनगरी,ता.०६: शासनाच्या नाविन्यपूर्ण असलेल्या सिंधूरत्न योजनेत “नोडल एजन्सी” म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला संधी द्यावी, अशी मागणी ही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दीपक केसरकर यांच्याकडे केली. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट दिली. यावेळी दळवी यांनी त्यांचे स्वागत केले.

या प्रसंगी संचालक महेश सारंग, रविंद्र मडगांवकर, विठ्ठल देसाई, विद्याधर परब जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे उपस्थित होते.