पत्रकारदिनी सावंतवाडीतील पत्रकारांना मायेची शाल…

23
2
Google search engine
Google search engine

आरपीडी हायस्कूलचा पुढाकार; संस्थाध्यक्ष विकास सावंतांचा अनोखा उपक्रम…

सावंतवाडी,ता.०६: मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून येथील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून सावंतवाडीत काम करणाऱ्या पत्रकारांचा मायेची शाल घालून सन्मान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, डिजिटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, प्रविण मांजरेकर, सचिन रेडकर, अनंत जाधव, विनायक गांवस, निखिल माळकर, अनुजा कुडतरकर, शैलेश मयेकर, आनंद धोंड, भुवन नाईक आदींना संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाळेच्या स्नेहसंमेलनप्रसंगी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. समाजासाठी २४ तास झटणाऱ्या पत्रकारांचा ‘पत्रकार दिनी’ गौरव करावा असा यामागचा उद्देश असल्याचे संस्थाध्यक्ष सावंत यांनी सांगितले.

यावेळी सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार मांजरेकर म्हणाले, स्व.भाईसाहेब सावंत यांचा समाजसेवेचा वारसा संस्थाध्यक्ष सावंत पुढे घेऊन जात आहे. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण आज संस्था व शाळेनं करत पत्रकारांचा जो सन्मान केला त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत.

ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले की, पत्रकारांची सहसा कुणी आठवण काढत नाहीत. परंतु, आरपीडी व संस्थाध्यक्ष सावंत यांनी आम्हाला आमंत्रित करत आमचा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. दरम्यान, पत्रकारांच्या हस्ते शिक्षकेत्तर कर्मचारी मारूती वावधने यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव प्रा. व्ही.बी. नाईक, खजिनदार सी.एल.नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, संचालक अमोल सावंत, सोनाली सावंत, प्रा.सतिश बागवे, माजी प्राचार्य के.टी.परब, प्राचार्य जगदीश धोंड, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक पी.एम.सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलींद कासार यांनी तर आभार शिक्षका प्रिती सावंत यांनी मानले.