विनायक राऊत यांना २ लाखाचे मताधिक्य मिळवून देणार…

177
2
Google search engine
Google search engine

सुशांत नाईक ; पत असेल तर कमळ चिन्हावर उमेदवार उभा करा…

कणकवली,ता.११: खासदार विनायक राऊत यांना लोकसभा निवडणुकीत २ लाखाचे मताधिक्य मिळवून देणारा असा दावा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज केला तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपात थोडी जरी पत असेल तर त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ या चिन्हावर उमेदवार लढवून दाखवावा असे आव्हानही दिले.
येथील विजय भवन येथे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली ते म्हणाले. युवासेना सिंधुदुर्ग तर्फे लवकरच गाव दौरा केला जाणार आहे. यात गाव पातळीवर संघटना मजबूत करणे. नवीन पदाधिकारी नियुक्त करणे. तसेच खासदार विनायक राऊत यांनी केलेली कामे सर्व जनतेपर्यंत पोचवणार आहोत.
श्री नाईक म्हणाले कणकवली विधानसभा मतदारसंघात खासदार विनायक राऊत यांना आम्ही दहा हजाराचे मताधिक्य देणार आहोत. भाजपची मंडळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपची सात लाख मते असल्याचा दावा करत आहेत. मात्र त्यांनी कितीही दावे केले तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात श्री राऊत यांना दोन लाखाचे मताधिक्य निश्चितपणे आम्ही मिळवून देणार आहोत.