तोंडवळी पाठोपाठ हडीतही वाळूचे रॅम्प उदध्वस्त…

382
2
Google search engine
Google search engine

पोलीस, महसूल, बंदर विभागाची संयुक्त कारवाई…

मालवण,ता.१२: तोंडवळी पाठोपाठ आज हडी येथील खाडीकिनारी अनधिकृत वाळू वाहतुकीसाठी उभारण्यात आलेले रॅम्प आज पोलिसांनी संयुक्त कारवाईत उदध्वस्त केले. यापुढेही ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

तालुक्यातील अनेक भागात वाळू माफियांनी अनधिकृतरित्या वाळूची वाहतूक करण्यासाठी रॅम्प उभारले आहेत. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहायक पोलिस निरीक्षक बी. एस. सुतार, मंडळ अधिकारी सौ. पिंगुळकर, बंदर विभागाचे अधिकारी श्री. गोसावी, पोलीस कर्मचारी सुशांत पवार, वृषाली पाटील, नमिता ओरसकर, राजा तेरेखोलकर, श्री. भोसले, कांदळगाव पोलीस पाटील शीतल परब यांच्या पथकाने आज हडी खाडीकिनारी धडक देत वाळूचे रॅम्प उदध्वस्त करण्याची कारवाई केली.