तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठीच ड्रग्ज मुक्त अभियान… 

197
2
Google search engine
Google search engine

प्रवीण कोल्हे ; तोंडवळीत जनजागृती कार्यक्रम…

मालवण, ता. १२ : आज तरुण पिढी ही ड्रग्ज, गांजा यासारख्या अंमली पदार्थांच्या विळख्यात गुरफटली असल्याचे दिसून येत असून ही एक गंभीर बाब बनली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या तरुण पिढीला अशा व्यसनांपासून दूर ठेवण्याबरोबरच त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या उद्धेशानेच ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा हे अभियान राबविण्यात येत असून यात सर्वांनी सहभागी होत हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तोंडवळी येथे केले.

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने १० जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाच्या पार्श्वभूमीवर तोंडवळी येथे शालेय विद्यार्थ्यांसह स्थानिक ग्रामस्थ, महिला यांना पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस कर्मचारी हेमंत पेडणेकर, सुशांत पवार, श्री. शिंदे, महिला पोलीस वृषाली पाटील, नमिता ओरसकर, राजा तेरेखोलकर, कैलास ढोले, अजय येरम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा या अभियानातर्गत शाळा, महाविद्यालये, पर्यटन स्थळे, बाजारपेठा, बसस्थानक, क्रिकेट स्पर्धांची ठिकाणे, गावागावातील जत्रा याठिकाणी पोलीस, आरोग्य विभाग, मानसोपचार तज्ज्ञ, नशामुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, इतर प्रशासकीय विभाग यांच्यावतीने अंमली पदार्थांचे सेवन, त्याचे दुष्परिणाम, या बेकायदेशीर कृत्यात सामील झाल्यास त्यावर केली जाणारी कायदेशीर कारवाई याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. या अभियानात सर्व नागरिक, विद्यार्थी, सेवाभावी संस्था, प्रशासकीय विभागांनी सहभागी होत जिल्हा ड्रग्ज मुक्त करण्यात आपले योगदान द्यावे असे आवाहनही श्री. कोल्हे यांनी यावेळी केले.