टर्मिनसचा प्रश्न सुटण्यासाठी प्रसंगी केंद्र सरकारवर दबाव टाकू…

259
2
Google search engine
Google search engine

विनायक राऊत; चिपीच्या धर्तीवर मळगावला दंडवतेचे नाव देण्याची करणार मागणी…

सावंतवाडी,ता.१४: रेल्वे टर्मिनसचा प्रश्न सोडवण्यासाठी मी आग्रही आहे. त्यासाठी प्रसंगी केंद्र सरकारवर दबाव टाकू, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिला. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये जो पर्यंत विलीन होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी मी आग्रही आहे तर दुसरीकडे सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव देण्याबाबत आमचा पाठपुरावा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने सावंतवाडी दौऱ्यावर असलेल्या श्री. राऊत यांची आज भेट घेण्यात आली व २६ जानेवारीला प्रस्तावित असलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी चर्चा करण्यात आली. यावेळी राऊत यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला. २६ तारखेला होणाऱ्या आंदोलनाला शिवसैनिक आपला पाठिंबा देतील आणि त्यात सहभागी होतील, असा ही शब्द त्यांनी यावेळी दिला.

यावेळी अ‍ॅड. संदीप निंबाळकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट, नंदू तारी, तेजस पोयेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपस्थित होते.