ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग २०२४ रिल्स स्पर्धेचे आयोजन…

71
2
Google search engine
Google search engine

प्रवीण कोल्हे; जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे…

मालवण,ता.१६: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून मालवण पोलीस ठाणे आयोजित ड्रग्जमुक्त अभियान २०२४ रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

स्पर्धेसाठी अंमली पदार्थ सेवन विरुद्ध जनजागृती देणारा संदेश हा विषय ठेवण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ३०००, २०००, १००० रुपयांचे पारितोषिक व चषक दिला जाणार आहे. स्पर्धकांनी आपली रिल्स २४ जानेवारी पर्यंत @drugs_mukt_sindhudurg_२०२४ या इन्स्टाग्राम पेजला कोलॅब करावी. ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे अधिक माहितीसाठी निलेश जाधव- ९४२०८६४४६४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.