मालवणातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

43
2
Google search engine
Google search engine

मालवण,ता.१७: येथील रोटरी क्लब आणि आय.एम.ए मालवण यांच्यावतीने आज एसटी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. लिमये हॉस्पिटल येथे एस टी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा ३७ एस टी चालक, वाहक तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.

या शिबिरामध्ये शारीरिक तपासणी तसेच रक्ततपासणी व डायबेटिक पेशंटच्या पायाच्या विशेष तपासण्या करून त्या पेशंटला मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. अजित लिमये, डॉ. मालविका झाटये, डॉ. प्रशांत पवार, डॉ. लीना लिमये, एसटीचे कर्मचारी तसेच रोटरी क्लब अध्यक्ष अभय कदम, सेक्रेटरी संदेश पवार, रंजन तांबे उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी लिमये हॉस्पिटलचा स्टाफ व हिंद लॅबचा स्टाफ यांचे सहकार्य लाभले.