सावंतवाडीत ” नाट्यगीत गायन स्पर्धेचे” आयोजन…

90
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१९: सैनिक नागरी पतसंस्था व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य सवेश नाट्यगीत गायन स्पर्धे”चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा राज्य मर्यादित आहे. १५ वर्षावरील वयोगटासाठी असून ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. प्राथमिक फेरी ऑनलाईन ऑडिओ क्लिप द्वारे घेण्यात येईल. यात प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार आणि उत्तेजनार्थ २ हजार पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी खाली दिलेल्या लिंकवर https://forms.gle/ap2cpGjimmRuH7YA7 फॉर्म भरून आपले ऑडियो रेकॉर्डिग ७ फेब्रुवारीच्या आधी पाठवावे. या तारखेनंतर आलेला ऑडियो स्वीकारला जाणार नाही, याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
स्पर्धेचे प्रवेश शुक्ल रू २०० रूपये असून खालील श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, अकाऊंट नंबर:- १४१०१०११००१२३१८, आयएफसी कोड:- BKID0001410 अकाऊंट नंबरवर गूगल पे द्वारे भरावे.
स्पर्धकांनी आपले ऑडियो रेकॉर्डिग व प्रवेश शुल्क भरलेल्याचा स्क्रिनशॉट “निरज मिलिंद भोसले- ९०११६०४५०९ या व्हॉटसॲप नंबरवर पाठवावे. आपला ऑडियो ३ ते ५ मिनिटांचा असावा, ऑडियोची सुरुवातीला आपले नाव, शहराचे नाव व ऑडियो करतानाची तारीख नमूद करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन फेरीमध्ये निवड झालेल्या स्पर्धकांना ७ फेब्रुवारीनंतर वैयक्तिक कळविण्यात येईल, अंतिम फेरी शनिवार १७ फेब्रुवारीला सायं ६ वाजता जनरल जगन्नाथराव शिवउद्यान सावंतवाडीच्या प्रांगणात घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी निलेश मेस्त्री ९४२३८१८७७०, किशोर सावंत ९४०५९२५८९५ यांच्याशी संपर्क साधावा. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व गोवा परिसरातील कलाकारांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.