कणकवलीत आजपासून रंगणार कबड्डीचा महासंग्राम…

75
2
Google search engine
Google search engine

अभय राणे मित्रमंडळाचे आयोजन ; जिल्ह्यातील महिलांचे १२ संघ खेळणार…

कणकवली,ता.१९: येथील अभय राणे मित्रमंडळाच्यावतीने ‘एआरएम चषक’ या कबड्डी स्पर्धेचा महासंग्राम २१ जानेवारीपर्यंत रंगणार आहे. कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या स्पर्धेत कणकवली तालुक्‍यातील पुरूषांचे ८ तर महिलांच्या कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील १२ संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेतील पुरुष गट प्रथम पारितोषिक रोख रुपये २५००४ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे पुरस्कृत व चषक मोहन राणे यांच्या स्मरणार्थ दिलीप राणे यांजकडून, द्वितीय पारितोषिक रोख रुपये १५००४ राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक पुरस्कृत व चषक अंजनी राणे यांच्या स्मरणार्थ दिलीप राणे यांजकडून, तृतीय पारितोषिक रोख रुपये ५००४ दिपक बागवे यांच्या स्मरणार्थ निखिल बागवे यांजकडून व चषक मधुकर जाधव यांजकडून,चतुर्थ पारितोषिक रोख रुपये ५००४ विजय इंगळे पुरस्कृत व चषक अजित काणेकर यांजकडून, अष्टपैलू खेळाडू रोख रुपये १५०० विनोद राठोड यांजकडून व चषक शालिनी राणे स्मरणार्थ संतोष राणे यांजकडून, उत्कृष्ट पकड रोख रुपये १००० गुणेश राणे स्मरणार्थ परेश परब यांजकडून व
चषक सर्वेश बागवे यांजकडून
उत्कृष्ट चढाई रोख रुपये १००० बच्चू प्रभूगांवकर यांजकडून व चषक सुप्रभा सावंत स्मरणार्थ व्यंकटेश सावंत यांजकडून, शिस्तबध्द संघ रुपये २००० प्रमोद सावंत यांजकडून चषक महादेव व पार्वती जोगळे स्मरणार्थ जोगळे कुटुंबिय यांजकडून देण्यात येणार आहे.
महिला गट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये ७००४ माजी नगरसेविका मेघा सावंत पुरस्कृत व चषक अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ राजूशेठ गवाणकर यांजकडून,द्वितीय पारितोषिक रोख रुपये ५००४ धनंजय कसवणकर पुरस्कृत व चषक अपीशेठ गवाणकर यांच्या स्मरणार्थ राजूशेठ गवाणकर यांजकडून, तृतीय पारितोषिक रुपये ३००४ अक्षय पेंडूरकर यांजकडून व चषक पार्वती जोगले यांच्या स्मरणार्थ रवी जोगले यांजकडून,चतुर्थ पारितोषिक रुपये ३००४ गणेश तळगांवकर पुरस्कृत व चषक पार्वती जोगले यांच्या स्मरणार्थ रवी जोगले यांजकडून, अष्टपैलू खेळाडू रोख रुपये १००४ व चषक चानी जाधव यांजकडून, उत्कृष्ट पकड रोख रुपये ७०४ व चषक चिंतामणी पेडणेकर यांच्या स्मरणार्थ अमोल पेडणेकर यांजकडून, उत्कृष्ट चढाई रोख रुपये ७०४ प्रथमेश घाडीगावकर यांजकडून व चषक सुलोचना केतकर यांच्या स्मरणार्थ प्रशांत केतकर यांजकडून, शिस्तबध्द संघ रोख रुपये १००४ प्रथमेश घाडीगावकर यांजकडून व चषक महादेव व पार्वती जोगळे यांच्या स्मरणार्थ जोगळे कुटूंबियाकडून देण्यात येणार आहे. या स्पर्धेला क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अभय राणे मित्रमंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.