रेडी येथील माऊली मंदिरात २२ जानेवारीला विविध धर्मिक कार्यक्रम…

37
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२०: श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे होणाऱ्या श्री रामलला मूर्ती प्राण-प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री देवी माऊली मंदिरात २२ जानेवारीला विविध धर्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मंदिरात अभिषेक, प्रास्ताविक व राममंदिर माहिती, रामरक्षा व मारूती स्तोत्र पठण, राम नाम जप, राममंदिर अयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, महाआरती, प्रसाद वाटप, दिपोत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी रामभक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.