हळवल फाटा येथे कारला अपघात…

951
2
Google search engine
Google search engine

तीन प्रवासी जखमी ; पोलीस घटनास्थळी दाखल…

कणकवली,ता.२४: मुंबई-गोवा महामार्गावरील हळवल फाट्यावरील अवघड वळणावर कारला अपघात झाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. कार मुंबई ते गोवा अशी जात होती. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई हुन गोव्याच्या दिशेने जाणारी कार (एमएच १४ एफ एस ९८५१) ही कार दुपारी १२: ३० वा. च्या सुमारास महामार्ग सोडून दोन तीन पलटी खात महामार्गालगतच्या जागेत जाऊन थांबली. या अपघातात तीन जणांना दुखापती झाल्या असून त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बापू खरात व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.