माडखोल गावात अंतर्गत रस्त्याच्या कामात अपहार…

215
2
Google search engine
Google search engine

ग्रामस्थांचा आरोप चौकशीची मागणी; अन्यथा २ फेब्रुवारीपासून करणार उपोषण…

सावंतवाडी,ता.२४: माडखोल गावात अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात आर्थिक अपहार झाला आहे, त्यामुळे या रस्त्याचा दर्जा तपासल्या शिवाय संबधित ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येवू नये, अशी मागणी तेथील ग्रामस्थ राजकुमार राऊळ, चद्रकांत राऊळ, स्वप्नील लातये गुंडू राऊळ, वासुदेव होडावडेकर यांनी केले आहे.

दरम्यान रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे, मात्र त्यात डांबर कमी प्रमाणात वापरण्यात आले आहे, तर दुसरीकडे त्या रस्त्याला लेव्हल नाही. त्यामुळे २ फेब्रुवारी पर्यंत रस्त्याची चौकशी न झाल्यास २ फेब्रुवारीला जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

यात असे नमुद करण्यात आले आहे की, माडखोल बेबीवाडा, धुरीवाडी व सावंतवाडा येथे झालेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट पणे केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १ फेब्रुवारी पर्यंत संबंधित ठेकेदारांना घेऊन रस्त्याची पाहणी करावी व कामाची दुरुस्ती करण्यात यावी दरम्यान १ फेब्रुवारी पर्यंत आपल्या कार्यालयाकडून संबंधित कामाची बिले अदा करण्यात आल्यास ग्रामस्थांकडून होणाऱ्या उद्रेकास सामोरे जावे तसेच रस्त्याचे काम व्यवस्थित नझाल्यास २ फेब्रुवारीला कार्यालयासमोर आमरण उपोषण तसेच आत्मदहन करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकार नमूद करण्यात आले आहे.