बांदा “इन डायरेक्ट” व्हाॅलिबाॅल स्पर्धेत नाबर स्कुल संघ विजयी…

123
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२९: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन बांदा मच्छीमार्केटच्या मैदानावर शालेय गटात आयोजित करण्यात आलेल्या इन डायरेक्ट व्हाॅलिबाॅल स्पर्धेत नाबर इंग्लिश मिडीयम स्कुलचा संघ विजयी झाला. अंतिम सामन्यात या संघाने खेमराज हायस्कुल संघावार मात केल्याने खेमराज संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

ही स्पर्धा भाऊ मिशाळ यांनी आयोजित केली होती. साखळी पद्धतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत नाबर स्कूल बांदा संघ विजयी झाला तर खेमराज हायस्कूलचा संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक खेमराज हायस्कूलच्या अ संघाला मिळाले.

या स्पर्धेत श्री कनयाळकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेच्या वेळी क्रिडाशिक्षक श्री पवार आणि नाबर प्रशालेचे क्रिडा शिक्षक प्रशांत देसाई उपस्थित होते.

पारितोषिकांचे वितरण बांदा प्रशालेचे माजी प्राचार्य एम. डी. मोरबाळे यांच्या हस्ते संपन्न झाले.