मडुरा गावाचा अखेर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला…

525
2
Google search engine
Google search engine

५९ लाखाचा निधी मंजूर; कामाचे संतोष परबांच्या हस्ते उद्घाटन…

बांदा,ता.२९: मडुरा गावाचा अखेर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्या ठिकाणी जलजीवन योजनेअंतर्गत ५९ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ सोसायटीचे माजी चेअरमन संतोष परब यांच्याहस्ते झाले.

यावेळी सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, सकल मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे, सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, मडूरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब, भाजपा तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा परब, देवस्थान समिती अध्यक्ष आनंद परब, मानकरी दत्ताराम परब, सचिव विजय परब, सुभाष गावडे, सोसायटी संचालक लाडू परब, चराठा उपसरपंच अमित परब, पोलीस पाटील नितीन नाईक, दिनेश नाईक, प्रवीण नाईक, रमेश परब, बाबली परब, संतोष जाधव, अरुण परब, नाना परब, श्री. कामुलकर, सिताराम परब, दत्ता मेस्त्री, सौ. चिंदरकर आदी उपस्थित होते.

या विहिरीच्या कामामुळे परबवाडी, रेखवाडी, मोरकेवाडी, शेर्लेकरवाडी, केरकरवाडी, जाधववाडी या वाड्यांमधील नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे, असे संजू परब यांनी स्पष्ट केले.