विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करून विकास साधावा…

37
2
Google search engine
Google search engine

लखमराजे भोसले; उड्डाण महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन…

सावंतवाडी,ता.०१: विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला शैक्षणिक विकास साधला पाहिजे, इंटरनेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही साधने त्यासाठीच उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे सिनेट मेंबर युवराज लखमराजे भोसले यांनी केले.

मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि लोकमान्य संचलित देशभक्त शंकराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे झालेल्या उड्डाण महोत्सव २०२४ या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या एक्सटेन्शन बोर्ड ऑफ स्टडीचे चेअरमन डॉ. कुणाल जाधव व लोकमान्य ट्रस्ट सावंतवाडी सचिव पंढरी परब उपस्थित होते. तसेच मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे प्राध्यापक डॉ. सचिन राऊत, तांत्रिक सहाय्यक किरण पाटील, सहाय्यक संतोष पाटील, क्षेत्रीय समन्वयक महेंद्र ठाकूर, उमेश परब, लोकमान्य ट्रस्ट सावंतवाडीचे नूतन संचालक सचिन मांजरेकर, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे क्षत्रिय व्यवस्थापक बाळासाहेब पांडव, लोकमान्य ट्रस्ट सिनियर एक्झिक्यूटिव्ह प्रविण प्रभूकेळुस्कर, एक्झिक्युटिव्ह महेश सातवसे, देशभक्त गवाणकर महाविद्यालयाचे प्राचार्य यशोधन गवस आदी उपस्थित होते.