मोबाईलचा शोध घेणाऱ्या प्रवीण वालावलकर यांचा अधिक्षकांकडून सन्मान…

513
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०१: चोरीला गेलेले तब्बल १० मोबाईल हस्तगत करण्यास यश मिळणाऱ्या सावंतवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार प्रवीण वालावलकर यांचा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. श्री. वालावलकर यांनी पोलिस पोर्टलच्या माध्यमातून चोरीला गेलेले व गहाळ झालेले तब्बल १० मोबाईल पुन्हा मिळवण्यास प्रयत्न केले होते. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी तपासासाठी ते गेले होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.