सिंधुदुर्ग दौर्‍यावर येणारे उध्दव ठाकरे सावंतवाडीत कार्यकर्त्याशी संवाद साधणार…

280
2
Google search engine
Google search engine

अरुण दुधवडकर; जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या माध्यमातून जल्लोषात स्वागताची तयारी…

सावंतवाडी,ता.०१: सिंधुदुर्ग दौर्‍यावर येणारे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे सावंतवाडीत येणार असून ते गांधी चौकात कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेेत, अशी माहिती आज येथे सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात येणार्‍या ठाकरे यांचे शिवसैनिकांच्या माध्यमातून जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यांनी केले.

श्री. दुधवडकर यांनी ठाकरे यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर आज कार्यकर्त्याशी संवाद साधला. त्यानंतर ते बोलत होते.

यावेळी सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, गीतेश राऊत, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, हिमांशू परब आदी उपस्थित होते.

४ फेब्रुवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सर्वप्रथम त्यांचे आगमन सावंतवाडी मध्ये होणार असून सावंतवाडी येथे गांधी चौकामध्ये ते सकाळी ११ वाजता जनतेशी संवाद साधतील या नंतर ते कुडाळ आणि दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दुधवडकर यांनी सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला .

लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उभारी घेईल ज्यांनी मानसन्मान, पदे दिली त्यांच्याशी गद्दारी केलेल्यांना आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवणार आहे. या गद्दारांचे पतन तर होणारच आहे मतपेटीतून जनता या शिवसेना पक्षातून गेलेल्या १३ गद्दारांना धडा शिकवणार आहे. लोकसभा निवडणूक ही गद्दारांची पतन करणारी निवडणूक असणार आहे आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ४० गद्दारांना जनता मतपेटीतून गाडून टाकेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

जनतेची सर्व सहानुभूती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे ज्या पद्धतीने यांनी पक्षाशी बेईमानी केली पक्षप्रमुखांची गद्दारी केली त्यांचा हिशोब या निवडणुकीत चुकता केल्याशिवाय जनता राहणार नाही असे ते यावेळी म्हणाले दरम्यान सावंतवाडी तालुक्यांमध्ये सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगमन होणार असून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे

कार्यकर्त्यांमध्ये या पक्षप्रमुखांच्या दौऱ्याने उत्साह संचारून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसैनिक पेटून उठून काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच मुंबईतील चाकर मानी आणि शिवसैनिक ही मोठ्या संख्येने या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत.