सावंतवाडीतील व्यावसायिक अक्षय कंठक यांचे निधन…

1528
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०७: येथील लिंबू व्यावसायिक अक्षय कंठक (वय ३६) यांचे आज गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे. सावंतवाडी शहरात लिंबू विक्रेते म्हणून ते परिचित होते. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. क्रिकेट तसेच अन्य खेळांमध्ये त्यांचा पुढाकार असे. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर अनेक जण हळहळले. दुपारी त्यांच्यावर येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.