दारू बाळगल्या प्रकरणी ओरोस येथे तिघांवर कारवाई…

281
2
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.०८: स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत तीन ठिकाणी धाडी टाकून अवैधरित्या दारू व्यवसाय करणाऱ्यांकडून तिघांवर कारवाई केली यात ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र दारू बंदीअधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ज्ञानेश्वर कामतेकर याचेकडून १८ हजार ७०० रुपये किमतीची, रॉकी इग्रासी फर्नांडीस याचेकडून १९ हजार रुपये किमतीची दोन्ही राहणार तेलीवाडी, कसाल आणि रॉबर्ट फर्नांडीस राहणार नवाबाजार कसाल, ता. कुडाळ यांचेकडून ७ हजार १०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू अवैध्यरीत्या बाळगून विक्री करीत असताना मिळून आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.