परशुराम उपरकर यांना जिल्हाभरातून कार्यकर्त्यांचा वाढता पाठींबा…

501
2
Google search engine
Google search engine

विनोद सांडव ; १८ रोजीच्या मेळाव्यातून भुमीका स्पष्ट होणार…

मालवण, ता. १० : माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे सरचिटणीस पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मनसे जिल्हाभरातील अनेक मनसे आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी मनसेचा राजीनामा देत परशुराम उपरकर जो राजकीय निर्णय घेतील त्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

यात मनसे माजी शहराध्यक्ष भारती वाघ, विद्यार्थी मनसेना उपतालुकाध्यक्ष जनार्दन आजगावकर, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत पराडकर, सर्जेकोट शाखाध्यक्ष दर्शन सावजी यांसह मिलिंद तेली, पांडुरंग करवडकर, सुदेश जामसंडेकर, विनायक परब, राजेश केळुसकर, रुपेश केळुसकर, दर्शन सावजी, अथर्व गोखले, मंदार पराडकर, चिन्मय पराडकर, जयेश पराडकर, प्रेमानंद पराडकर, मंदार हिंदळेकर, आडवली विभाग अध्यक्ष दिनेश तांडेल यासह अनेक आजी, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देत माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या निर्णया सोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. पुढची दिशा उपरकर यांच्या कुडाळ येथील १८ रोजी होणाऱ्या मेळाव्यातुन स्पष्ट होणार आहे. अशी माहिती विनोद सांडव यांनी दिली.