कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर १३ फेब्रुवारी पासून माघी गणेशोत्सव…

95
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १० : शहरातील वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून १३ फेब्रुवारीपासून कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगण येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता धार्मिक विधी, सायंकाळी ४ वाजता गणेश आगमन सोहळा, १३ रोजी सकाळी १० वाजता गणेश मूर्तीचे पूजन, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता संगीत भजन, ७ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘उद्धार झाला वारुळाचा’ अर्थात ‘नागपंचमी’ सादर होणार आहे. १४ रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता प्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता संगीत भजन, ७ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ, कुडाळचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘भेद शिवपिंडीचा जन्म कालरात्रीचा’ अर्थात ‘मृत्यू रुद्राणी’ सादर होणार आहे.

१५ रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, १० वाजता रक्तदान शिबीर, दुपारी १२.३० वाजता प्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता संगीत भजन, ७ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवणचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘ब्रस्मपदार्थ’ अर्थात ‘महिमा जगन्नाथ पुरीचा’ सादर होणार आहे. १६ रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता प्रसाद, सायंकाळी ५ वाजता हळदीकुंकू समारंभ, ६.३० वाजता संगीत भजन, ७ वाजता महाआरती, रात्री ९. वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘पुनः भक्षिती मांस आईचे-निर्माण वृश्चिक राशीचे’ सादर होणार आहे.

१७ रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता प्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता संगीत भजन, ७. वाजता महाआरती, रात्री ९ वाजता बाबू लुडबे यांच्या स्मरणार्थ रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहेत. मोठ्या गटातील तीन विजेत्यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार रुपये तर लहान गटातील तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. संपर्कासाठी मंदार लुडबे (८५३०७२१८००), अक्षय नरे यांच्याशी संपर्क साधावा. १८ रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, १० वाजता सत्यनारायण पूजा व तिर्थप्रसाद, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता भजनबारी सामना श्री देवी भजन मंडळ, देवगडचे बुवा संदीप लोके (पखवाज- योगेश सामंत) व हनुमान भजन मंडळ, कुडाळचे बुवा गुंडू सावंत (पखवाज-विराज बावकर) यांच्यात हा सामना होणार आहे. १९ रोजी सकाळी ९ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संजय लुडबे यांनी केले आहे.