कोरजाई कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन…

380
2
Google search engine
Google search engine

तहसिलदारांना निवेदन; ३ दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन, सहदेव माडये…

वेंगुर्ले,ता.१३: तालुक्यातील कोरजाई येथील कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन होत आहे. याबाबतची तक्रार सहदेव अनंत माडये (रा. कोरजाई-गाडेधाववाडी) यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच येत्या ३ दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, कर्ली खाडीत दररोज २५ ते ३० बोटी उत्खनन करत असून काही लोक शासनाच्या जागेत वाळू डंपरमध्ये भरतात. त्यामुळे उत्खनन केल्यामुळे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. संबंधित प्लॉट हा कांदळवन तोडून खारबंधाराच्या बाहेर अनधिकृत माती टाकून केलेला आहे. संबंधित रॅम्पमध्ये हा वाळूच्या परवाने मिळाले की वापरता जातो. पण मागील वर्षी प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे संबंधित भागात परवाना मिळाला नाही. त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे आपल्याकडे आहेत, असे सहदेव अनंत माडये यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे येत्या ३ दिवसात कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माडये यांनी दिला आहे.