असलदेतील होम मिनिस्टर स्पर्धेत नेहा जेठे पैठणीच्या मानकरी…

157
2
Google search engine
Google search engine

प्रिया शेट्ये द्वितीय तर मधुरा लोके तृतीय क्रमांक; गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम…

कणकवली,ता.१४: तालुक्‍यातील असलदे उगवतीवाडी येथे झालेल्‍या होम मिनिस्टर स्पर्धेत नेहा विशाल जेठे ह्या विजेत्‍या ठरल्‍या. त्‍यांना मानाची पैठणी प्रदान करण्यात आली. द्वितीय क्रमांक प्रिया प्रेमानंद शेटये आणि तृतीय क्रमांक मधुरा मनोज लोके यांना देण्यात आला. ही स्पर्धा पत्रकार आणि असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी पुरस्कृत केली होती. ब्राम्‍हणदेव सेवा मंडळाच्यावतीने गणेश जयंतीच्या औचित्यावर हा कार्यक्रम झाला.

होम मिनिस्टर ‘खेळ पैठणीचा’स्पर्धेत २६ महिलांनी सहभाग घेतला होता. सुप्रसिद्ध निवेदक पत्रकार उमेश परब यांनी उपस्थितांचे मनोरंजन करत ४ फेरीत होम मिनिस्टर ही स्पर्धा खेळवली. प्रथम तीन विजेत्‍यांना भाग्यलक्ष्मी लोके, लक्ष्मण लोके, शिवाजी लोके यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यावेळी असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, माजी सरपंच लक्ष्मण लोके, सुरेश लोके, गणेश लोके, रामचंद्र जेठे, महेश लोके, प्रदीप हरमलकर, राकेश आचरेकर, संदेश आचरेकर, नितीन आचरेकर, दयानंद डगरे, सचिन लोके, नितीन आचरेकर, दिवाकर डगरे, पंकज आचरेकर, प्रकाश आचरेकर, विश्राम लोके, अनिल लोके, राजू जेठे, दिनेश जंगले, विष्णू डगरे, सुरेश डगरे, विजय आचरेकर, विशाल जेठे, संजय जेठे, सचिन हरमलकर, मनोज लोके, जितेंद्र लोके, सुरेश जेठे, अनिल कोठारकर, प्रशांत लोके, किशोर जेठे, चंद्रकांत जेठे, गणेश तेली, विशाल जेठे, सत्यवान लोके, समीर आचरेकर, अक्षता जेठे, मयुर जंगले यांच्यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

माघी गणेश जयंती उत्‍सवात गांगो – ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ शेवरे तांबळवाडी बुवा – वैभव घाडीगांवकर, ब्राम्हणदेव प्रासादीक भजन मंडळ हुंबरट बूवा किशोर दळवी, कुलस्वामी प्रासादिक भजन मंडळ मिठबांव डगरेवाडी बुवा – सगुन डगरे यांनी संगीत भजन सेवा करत हरिनामातून समाज प्रबोधन केले.

या उत्‍सवाला आमदार नितेश राणे, शिवसेना जिल्‍हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी सभापती मनोज रावराणे, भाग्यलक्ष्मी साटम, सरपंच चंद्रकांत डामरे, माजी सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगांव सरपंच रविराज मोरजकर, माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, सोसायटी व्हा.चेअरमन दयानंद हडकर, आयनल सोसायटी चेअरमन बाळा चिंदरकर, बुवा – वैभव घाडीगावकर शेवरे, तात्या निकम , वैभव मालंडकर, आबू मेस्त्री, तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर खोत, उपसरपंच सचिन परब, निवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके. मंडप डेकोरेटर फिरोज नावलेकर यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शवली.