निरवडे येथे २५ फेब्रुवारीला मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

198
2
Google search engine
Google search engine

संजय तानावडेंची माहिती; रुग्णांनी लाभ घेण्याचे केले आवाहन…

सावंतवाडी,ता.१५: अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर व श्री साटम महाराज सेवा कला-क्रीडा मंडळ व ग्रामस्थ निरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र निरवडे येथे २५ फेब्रुवारीला सकाळी १० ते २ या वेळेत होणार आहे.

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयविकार, हाडांचे फ्रैंक्चर, गुडघ्याचे लिगामेन्ट शस्त्रक्रिया, कॅन्सर ऑपरेशन, मेंदू व मणका ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपरेशन यांच्याशी संबंधित रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साटम महाराज सेवाकला-क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय तानावडे यांनी केले आहे.

अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर व श्री साटम महाराज सेवा कला क्रीडा मंडळ व सर्व ग्रामस्थ निरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड धारकांना मोफत ऑपरेशनची सोय करण्यात आली आहे. यावेळी रक्तातील साखर तपासणी, बीपी व पीसीजी तपासणी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिसची सोय, खुबा व गुडघा प्रत्यारोपण मोफत केले जाणार आहे. या शिबिरात रुग्णांनी नाव नोंदणीसाठी संजय तानावडे ९१३०६५०१०२ यांच्याशी संपर्क साधावा आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.