प्रवीण भोसलेंचा ७५ वा वाढदिवस सर्वपक्षियांकडून साजरा करणार…

273
2
Google search engine
Google search engine

विकास सावंत; रमाकांत खलप व खेमसावंत भोसलेंची प्रमुख उपस्थिती…

सावंतवाडी,ता.१६: माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा ७५ वा वाढदिवस १९ फेब्रुवारीला होत आहे. हा वाढदिवस सर्वपक्षिय एकत्र येत प्रविण भोसले मित्रमंडळाकडून साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून उपस्थित राहावे, असे आवाहन आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांनी दिली. दरम्यान यावेळी देशाचे माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप तसेच सावंतवाडी संस्थांनचे राजे खेमसावंत भोसले उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रवीण भोसले मित्र मंडळाच्या वतीने भोसले यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा वाढदिवस १९ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता आरपीडी हायस्कूलच्या नवरंग सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर, राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, ॲड. सायली दुभाषी, विवेक गवस, सचिन पेडणेकर, उदय दळवी आदी उपस्थित होते.