देवगड येथे परिट समाजाच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती व स्नेहमेळावा…

71
2
Google search engine
Google search engine

देवगड,ता.१८: श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघच्या वतीने २३ फेब्रुवारीला संत गाडगे महाराज जयंती व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंधू भगिनींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा कुणकेश्वर पावणाई देवी मंदिर येथे होणार आहे.
यावेळी सकाळी ८.३० वा. श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसर व समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम, सकाळी १० वा. स्वागत समारंभ दीप प्रज्वलन सत्कार, सकाळी १०.३० वा. मान्यवरांचे मनोगत व अध्यक्षीय भाषण, दुपारी १ वा. महाप्रसाद, २.३० वा. महिलांसाठी हळदीकुंकू, दुपारी ३ वा. श्री संत गाडगे महाराज कलानिकेतन आंदूर्ले प्रस्तुत “गाडग्यातील शिदोरी” हा संगीत कार्यक्रम, सायं ४.३० वाजता आभार व समारोप अशा विविध कार्यक्रमाने संत गाडगे महाराज जयंती व स्नेह मेळावा साजरा करण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी व भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, देवगड तालुकाध्यक्ष विजय पाटील मोबा.९४२११४६३२३, सचिव शरद लाड व देवगड येथील पदाधिकारी यांनी केले आहे.