वेंगुर्ला राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित पदाधिऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान…

131
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१९: तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सुप्रिया परब, शहर उपाध्यक्ष संदेश रगजी, युवक शहर अध्यक्षपदी नितीन तेली, महिला शहर अध्यक्षपदी दीपाली गावडे, वेंगुर्ले शहर कार्यकारिणी सदस्यपदी शैलेश भोसले आदींची निवड करण्यात आली.

सर्व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नम्रता कुबल, सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा अँड. रेवती राणे व वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.