मागणाव शिवापुर येथे उभारण्यात येणार्‍या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट…

88
2
Google search engine
Google search engine

मनसेचा आरोपः रातोरात काम केल्याचा दावा,चौकशीची बांधकाम अधिकार्‍यांकडे मागणी

कुडाळ ता.२३: माणगाव शिवापुर येथे सुरू असलेेल्या संरक्षण भिंंतीचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. रातोरात हे काम केले जात आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी तेथील मनसेचे पदाधिकारी सचिन सावंत यांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंता महेद्र कीणी यांना दिले आहे. या कामांची तात्काळ दखल घेवून योग्य ती भूमिका घ्या. अन्यथा झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल असा इशारा त्यांनी दिला आहे. यात माणगाव शिवापुर रस्त्यावर असलेली संरक्षण भिंत आणि वसोली शिवापुर या रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.