वेत्ये सरपंच गुणाजी गावडे समर्थकांसह शिंदे गटात दाखल…

629
2
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश; संघटना मजबूत करण्याच्या सूचना…

सावंतवाडी,ता.०१: वेत्ये सरपंच गुणाजी गावडे व युवा सेनेचे माजी पदाधिकारी योगेश नाईक यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटना मजबूत करा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्या. नुकताच हा प्रवेश मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

याबाबतची माहिती शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी यांनी दिली. श्री. गावडे गेले काही दिवस ठाकरे सेनेत नाराज होते. त्यांना डावलण्यात आल्याचे आरोप होता. त्यानंतर ते शिंदे गटाच्या संपर्कात होते. आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे.