सावंतवाडीत उद्या भाजपाच्या बुथ अध्यक्षांचे महासंमेलन…

359
2
Google search engine
Google search engine

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती; उपस्थित रहा, राजन तेलींचे आवाहन…

सावंतवाडी,ता.०२: भाजपच्या बुथ अध्यक्षांचे महासंमेल उद्या सावंतवाडीत होणार आहे. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.

हे संमेलन सायंकाळी ४ वाजता राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून करण्यात आले.