वेंगुर्ले शहरातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत करा..

153
2
Google search engine
Google search engine

मनसेची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा…

वेंगुर्ले,ता.११: शहरातील बाजारपेठेत सर्व दुकाने व आस्थापनावर मराठी पाट्या लावण्यात याव्यात, अशी मागणी आज मनसेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली. दरम्यान ८ दिवसात पाट्या बदलल्या गेल्या नाहीत तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल. त्यावेळी होणाऱ्या सर्व प्रकाराला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्याधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली.

यावेळी परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, उपतालुकाध्यक्ष महादेव तांडेल, शहराध्यक्ष सुरज मालवणकर, सौ.स्नेहा कुडाळकर, सहदेव फोडनाईक, संतोष परब, प्रथमेश नाईक, प्रशांत कुडाळकर, प्रफुल्ल धुरी, विक्रम मोरजकर, प्रतीक गोरे, गौरव मराठे,तेजस वेंगुलेकर, लक्ष्मण दळवी आदी पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते.