वाहनाला बाजू देताना विलवडे येथे ट्रॅक्टरला अपघात, चालक जखमी…

136
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०२: समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगत दलदलीत जाऊन ट्रॅक्टर अपघातगस्त झाला. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दाणोली-विलवडे खांबलेश्वर मंदिर येथे घडली. वाहन चालक जखमी झाल्याने तो काही वेळ बेशुध्द होता. स्थानिक ग्रामस्थ व सरपंच प्रकाश दळवी अपघातस्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. ट्रँक्टरचे किरकोळ नुकसान झाले. याबाबत बांदा पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल नव्हती.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी ट्रॅक्टर चालक हा ओटवणे येथून बांदाच्या दिशेने दोडामार्ग येथे रस्त्याच्या कामासाठी ट्रॅक्टरला हॉट मिक्सर जोडून घेऊन जात होता. विलवडे खांबलेश्वर मंदिर जवळ दुसर्‍या वाहनाला बाजू देताना वाहन चालकांचा ताबा सुटून रस्त्यालगत दलदलीत ट्रॅक्टर अपघातग्रस्त झाला. याबाबत बांदा पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात वाफोली डोंगरीकर हाँटेल जवळ उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक कलंडून अपघातग्रस्त झाला होता. सदर रस्ता खड्डेमुक्त झाल्याने वाहन चालक सुसाट वेगात जात आहेत. वेग मर्यादा नियत्रंणात नसल्याने हा अपघात झाल्याचे विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी सांगितले.