कवी सफरअली यांच्या काव्यसंग्रहाचे २० तारखेला पुण्यात प्रकाशन…

62
2
Google search engine
Google search engine

अभिनेत्री मुक्ता कदम; कृतार्थ शेवगावकर, कवयित्री अंजली ढमाळ यांचे कविता वाचन…

कणकवली,ता.१७: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कवी सफरअली इसफ यांच्या ‘अल्लाह ईश्वर’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार २० एप्रिलला सायंकाळी ६ वाजता पुणे साने गुरुजी स्मारक नाथ पै सभागृह येथे होणार आहे. राष्ट्रसेवा दलातर्फे आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ अभ्यासिका प्रा.वंदना पलसाने, कवी अजय कांडर यांच्या हस्ते ‘अल्लाह ईश्वर ‘ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम दोन विभागात असून पहिल्या विभागात अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर आणि नामवंत कवयित्री अंजली ढमाळ ही कलावंत मंडळी सफरअली इसफ यांच्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. दुसऱ्या सत्रात प्रकाशन सोहळा होणार आहे. यावेळी प्रा वंदना पलसाने आणि कवी अजय कांडर यांच्या हस्ते अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. यावेळी प्रा.पलसाने, कवी कांडर अल्लाह ईश्वर मधील कवितांवर विस्ताराने भाष्य करणार आहेत. कवी सफरअली इसफ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत कवी असून वैभववाडी तिथवली सारख्या आडवळणाच्या गावात राहून ते सुमारे ३५ वर्ष निष्ठेने कविता लिहीत आहेत.