मिलाग्रीस येथे आयोजित समर कॅम्पला क्रीडा अधिकाऱ्यांची भेट…

202
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२२: मिलाग्रीस हायस्कूल येथे आयोजित समर कॅम्पला क्रीडा अधिकारी सौ. विद्या शिरस भेट दिली. यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या संकल्पनेतून १५ ते २७ एप्रिल या कालावधीमध्ये समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सौ. शिरस यांनी कॅम्पला भेट देऊन मुलांना शुभेच्छा व मार्गदर्शन केले. यावेळी एप्रिल कमिटीचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.