राजापूर महायुतीच्या सभेत सावंतवाडीच्या दीपेशचा “बोलबाला”…

565
2
Google search engine
Google search engine

भाजपाचे “कमळ” ठरले आकर्षक; विशाल परबांच्या संकल्पनेतून सादरीकरण…

सावंतवाडी,ता.२६: महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार सभेला आज सावंतवाडीतील कलाकार दीपेश शिंदे यांनी सादर केलेले भाजपचे कमळ चिन्ह सभेचे आकर्षण ठरले. विशेष म्हणजे सावंतवाडी युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून त्यांनी हे सादरीकरण केले होते. त्यामुळे उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांकडून शिंदे यांच्यासह परब यांचे कौतुक करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. राणे यांची प्रचार सभा आज राजापूर येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत श्री. शिंदे यांनी अनोख्या पद्धतीने आपले अंग रंगून भाजपाचा उत्साहात प्रचार केला. त्याच्या या कलाकृतीला उपस्थितांकडून दाद देण्यात आली.