ठाकरे शिवसेनेने सावंतवाडीत बुकींग केलेल्या गांधी चौकातील जागेत महायुतीची सभा…

653
2
Google search engine
Google search engine

हाच केसरकरांचा थंड दहशतवाद; रुपेश राऊळ, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार…

सावंतवाडी,ता.०५: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेच्या सभेसाठी बुकिंग करुन ठेवण्यात आलेली गांधी चौकातील जागा अचानक महायुतीच्या सभेसाठी घेण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे शिवसेना आणि दीपक केसरकर यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. आपल्याला कोणतीही विचारणा न करता थेट प्रशासनाला हाताशी धरून केसरकरांनी रडीचा डाव खेळला आहे. हाच त्यांचा थंड दहशतवाद आहे. नैराश्येतून त्यांनी हा प्रकार केला, असा आरोप करीत याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.राऊळ यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, काल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची तर आज शेतकरी संघटनेचे नेते अण्णा केसरकर यांच्या सभेसाठी दोन दिवस गांधी चौकातील जागा ठाकरे शिवसेनेकडुन बुक करण्यात आली होती. तसा पालिकेशी पत्र व्यवहार केला होता. आवश्यक असलेली प्रक्रिया पुर्ण करण्यात आली होती. मात्र केसरकरांनी नेहमी प्रमाणे रडीचा डाव खेळत त्यांनी प्रशासनाला हाताशी धरुन त्या जागी आपली सभा आयोजित केली आहे. याबाबत आम्हाला कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर मुख्याधिकारी सागर सांळुंखे यांना विचारले असता त्यांनी आपण कोणतीही परवानगी दिली नाही तर प्रांताधिकार्‍याच्या स्तरावर ही परवागनी देण्यात आल्याचे सांगितले.

याबाबत श्री. राऊळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून केसरकरांकडून हा प्रकार करण्यात आला. हा त्यांना शोभणारा नाही तसेच त्यांना नैराश्य आल्यामुळे हे प्रकार करीत आहेत. हाच त्यांचा थंड दहशतवाद आहे, असा आरोप त्यांनी केला असून याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.