गौरी बांदेकर रिल्स ग्रुप राज्यात प्रथम…

335
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१२: कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आयोजित चला मराठी बोलूया या विषयावरील राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेमध्ये बांदा येथील गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
या रील्स मध्ये गौरी बांदेकर, अवंती पंडित, भारती परब, गजेंद्र कोठावळे, अंकिता पवार यांनी अभिनय साकारला आहे.   यामध्ये दिग्दर्शन, संकल्पना, संवाद, एडिटिंग या सर्व बाजू गौरी बांदेकर यांनी सांभाळल्या आहेत. यापूर्वीही गौरी बांदेकर रील्स ग्रुपने विविध राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या रिल्स ग्रुप मधील प्रत्येक कलाकार हा गायन, अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. या यशाबद्दल या ग्रुपवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा आघाडीचा रिल्स ग्रुप असून आतापर्यंत शेकडो रिल्स त्यांनी केले आहेत. समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी रिल्सच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे. तसेच अनेक रिल्स मधून सामाजिक संदेश देखील देण्याचे काम केले आहे. त्यामुळे या रिल्सना अनेकांनी पसंती दिली आहे.