भाईसाहेब सावंत विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून ५१ हजाराची देणगी…

390
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१६: भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव येथे १९८७/८८ मध्ये दहावी असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेच्या इमारत बांधकामासाठी ५१ हजार ५५५ रुपयांची देणगी तसेच स्मरणिकेसाठी २० हजार रुपयांची देणगी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
विद्यालयात सन १९८८ शालान्त परीक्षेतील माजी विद्यार्थी ३५ वर्षानी एकत्र आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रशाळेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री पराडकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री चवरे, निवृत्त शिपाई प्रभाकर कानसे, माजी विद्यार्थी गुरुनाथ धुरी, ॲड. सुजाता नाईक, तुकाराम भोगण आदी उपस्थित होते.
सुरुवातीला दिवंगत शिक्षक अविनाश शिरोडकर, श्रीमती भाट, श्री दळवी, श्री कानसे, श्री दाभोलकर व माजी दिवंगत विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या त्याच्या कार्यकतृत्वांची ओळख करून दिली.
धोंडीराज कशाळीकर, ॲड. सुजाता नाईक, वर्षा हजारे, संगीता सावंत, सुवर्णा धुरी, मिलिंद सावंत, सुशील सावळ, जोस्त्ना कासार, श्याम बोंद्रे, शैलेश कोरगावकर, सुशील देसाई, विद्या माधव, लक्ष्मण वर्णेकर, भास्कर माजगावकर, मंदा पिकुळकर, छाया सावंत, गुरुनाथ धुरी यानी मनोगत व्यक्त केले. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी मिलिंद सावंत सुशील सावंत व गुरुनाथ धुरी यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून भास्कर माजगावकर यांनी आभार मानले.