काळजी मिटली, सावंतवाडीत आता “सीटीस्कॅन”ची सोय…

734
2
Google search engine
Google search engine

डॉ.अभिजीत चितारींचा पुढाकार; अत्याधुनिक मशीनव्दारे निदान, २४ तास सेवा…

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.१६: कोलगाव येथील चितारी हॉस्पिटल मध्ये आता “सीटीस्कॅन” यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. यासाठी हृदयरोग तज्ञ डॉ. अभिजीत चितारी यांनी पुढाकार घेतला आहे. या ठिकाणी 32 slice ct scan या अत्याधुनिक मशीनव्दारे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे निदान होणार आहे. त्याचा फायदा सावंतवाडीसह पसिरातील तालुक्यांना होणार आहे. डॉ. चितारी यांच्या या निर्णयामुळे अपघातात गंभीर झालेल्या किंवा हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना आता सावंतवाडी बाहेर जावे लागणार नाही तर आपत्कालीन परिस्थितीत आता याच ठिकाणी ही सेवा मिळणार आहे. रुग्ण व लोकांची मागणी लक्षात घेवून आपण ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी नियमित दरात ही सेवा आपण रुग्णांना उपलब्ध करुन देणार आहोत, असे डाॅ. चितारी यांनी सांगितले.

श्री.चितारी यांनी गेली ६ वर्षे सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात हदयरोग तज्ञ म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी २ वर्षापुर्वी कोलगाव येथे मुंबई-गोवा महामार्गाला लागून आपले हॉस्पिटल सुरू केले आहे. त्या ठिकाणी ते अत्यवस्थ रुग्णांना सेवा देतात. मात्र ही सेवा देत असताना हृदयविकाराचा झटका किंवा अन्य अत्यवस्थ परिस्थिती रुग्णाला निदान करण्यासाठी अन्य ठिकाणी न्यावे लागत होते. यात रुग्ण दगावण्याचे प्रमाणे अधिक होते. ही गंभीर समस्या लक्षात आल्यानंतर श्री. चितारी यांनी आपल्या हॉस्पिटल मध्ये सीटीस्कॅन यंत्रणा कार्यान्वीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याच्या रुग्णालयात ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

या ठिकाणी छाती, पोट, किडनी स्टोन यांच्यासह मेंदू रक्तातील गाठी याचे निदान केले जाणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा २४ तास उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी रेडीओलॉजिस्ट म्हणून गोवा येथील डॉ. कल्पित तेंडोलकर यांचा ऑनलाईन सल्ला घेतला जाणार आहे.

याबाबत डाॅ. चितारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सावंतवाडीत हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा सुरू केल्यानंतर रुग्णांसाठी काही तरी वेगळे करण्याचा विचार होता. वेळीच निदान न झाल्यामुळे अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे हा प्रकार लक्षात आल्यानंतर ही यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून नियमीत दरात चितारी हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवा देण्याचा आमचा मानस आहे. या मशिनच्या माध्यमातून पुर्ण शरीराचे सिटीस्कॅन, सिटी एजोग्राफी, सिटी गायडेड, बायओप्सी या सेवा दिल्या जाणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी किंवा अपॉईटमेंटसाठी 9405491738, 9405811738, 7264894487,02363291838 या नंबरशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. चितारी यांनी केले आहे.