वादळी वाऱ्यामुळे कळसुलीत वीज खांब कोसळला…

118
2
Google search engine
Google search engine

ठिकठिकाणी विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित…

कणकवली,ता.१६: कणकवली शहर तसेच तालुक्यात आज दुपारी ३ ते ३.३० या दरम्यान वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यात तालुक्यातील कळसुली उल्हासनगर बौद्धवाडी येथे वीज वाहिन्या आणि वीज खांब जमिनीवर कोसळले. तालुक्याच्या अन्य भागातही वीज तारांवर वृक्ष आणि फांद्या तुटून पडल्याने तालुक्यातील वीज पुरवठा ठप्प झाला आहे.