विवाहितेचा विनयभंग, वैभववाडीतील तरुणावर गुन्हा दाखल…

323
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.१६: विवाहितेचा विनयभंग केल्या प्रकरणी वैभववाडी येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सीताराम देसाई ( वय ४० ) रा. भुईबावडा-रिंगेवाडी असे त्याचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार पीडित महिला अंघोळीला गेली असता आरोपीने तीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत तीने दिलेल्या तक्रारी नुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास हवालदार प्रीती शिंगारे करीत आहेत.