गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची उभारणी…

49
2
Google search engine
Google search engine

 

कणकवली ता.१६: शिवशौर्य प्रतिष्ठान व कोकण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ गगनगडाचेे ट्रस्टी संजयसिंह पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उभारण्यात आला.
यावेळी दिगंबर राऊत, अजित कुडकर, प्रसाद भोई, गणेश माने, साई इंगळे, सुजित शेंगाळे, साक्षी इंगळे, अमामिका भगत, प्रवीण शेंगाळे, दशरथ इंगळे, देविदास शेंगाळे यांच्यासह दुर्गसेवक, धारकरी बंधू, रणरागिणी, मावळे, वारकरी, गडावरील सेवेकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र गगनगिरी महाराज आश्रम व गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. शिवशौर्य प्रतिष्ठान व कोकण परिवाराच्यावतीने दरवर्षी गड किल्ले संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवून किल्ल्यांची साफसफाई व स्वच्छता केली जाते. गगनगडावर या संस्थांच्यावतीने हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ उभारल्याबद्दल सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.