कुडाळ येथे कपड्याच्या गोदामाला आग, लाखोंचे नुकसान…

475
2
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२४: येथील व्यावसायिक वामन पाटणकर यांच्या कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या गोदामाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली. बाजारपेठेतील ओटवणेकर तिठा परिसरात घडली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून बाजूला असलेली घरे व दुकाने बचावली. आग कशी लागली हे कारण मात्र कळू शकले नाही.

बाजारपेठेत ओटवणेकर तिठा या गजबजलेल्या ठिकाणी हे कापड दुकान आहे. परिसरात एकमेकांना लागून दुकाने आहेत. पाटणकर यांच्या कापड दुकानाचे गोडाऊन तिसऱ्या मजल्यावर आहे. खालच्या मजल्यावर कापड दुकान आहे. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या गोडाऊनला अचानक आग लागली. धुराचे लोट आतून बाहेर पडू लागले, तेव्हा परिसरातील व्यापारी व्यवसायिकांनी ही आग बघितल्यावर आग विझवण्यासाठी धावपळ केली. अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत आग गोडाऊन मध्ये पसरली. बाहेर आगीचे धुराचे लोट पसरू लागले. कुडाळ एमआयडीसीचा अग्निशमन बंब गाडी तात्काळ घटनास्थळी आला. आणि आग विजवण्यास सुरुवात केली.. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वेळीच आग विझवण्यात आल्याने आसपासची घरे दुकाने बचावली. त्यातच पावसाळी ढगाळ वातावरण असल्यामुळे आग मोठी पसरली नाही. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे कुडाळ नगरपंचायतचा अग्निशामक बंब मात्र एक तासाने पोचला. वेंगुर्ले येथूनही अग्निशामक बंब मागविण्यात आला होता.