महामंडळाच्या एसटी बस आता पेडणे स्थानकावर थांबणार…

1197
2
Google search engine
Google search engine

मागणीनंतर सकारात्मक निर्णय; दोन्ही राज्यातील प्रवाशांना होणार फायदा…

बांदा,ता.२४: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी महामंडळाच्या बसेस आता पेडणे बस स्थानकावर थांबणार आहे. त्यासाठी तेथील नागरिक जगन्नाथ पंडीत यांनी ग्रामस्थांच्यावतीने पाठपुरावा केला होता. त्यानंतर याबाबतचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी तशा प्रकारचे आदेश होते. परंतु त्या ठिकाणी बस घेऊन जाणारे चालक थेट मुंबई-गोवा महामार्गावर गाडी गोव्यात घेऊन जात होते. त्याचा फटका दोन्ही राज्यातील प्रवाशांना सहन करावा लागत होता. याबाबत अनेकदा लक्ष वेधून सुद्धा सकारात्मक भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे पंडित यांनी लेखी मागणी केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे तर नाही वाघ जंक्शन परिसरात वाहतूक वाढविण्यासाठी पोलीसाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.