कणकवली तालुक्‍याचा निकाल ९९.०६ टक्‍के….

55
2
Google search engine
Google search engine

तालुक्‍यात निधी सावंत १०० टक्‍के गुण मिळवून प्रथम : गायत्री राठोड द्वितीय तर मानसी नानचे तृतीय…

कणकवली, ता.२७ : मार्च २०२४ मध्ये झालेल्‍या दहावी परीक्षेत कणकवली तालुक्‍याचा निकाल ९९.०६ टक्‍के लागला आहे. तालुक्‍यात तसेच जिल्ह्यात सेंट उर्सुला हायस्कूलची निधी प्रकाश सावंत ही १०० टक्‍के गुण मिळवून प्रथम आली आहे. तर गायत्री विजयकुमार राठोड ही ९९.२० टक्‍के गुण मिळवून द्वितीय, मानसी राजन नानचे ही ९८.६० टक्‍के गुण मिळवून तृतीय तर चिन्मयी राजन चिके ९८.२० टक्‍के गुण मिळवून चौथी आली. (सर्व न्यू इंग्‍लिश स्कूल फोंडाघाट) तर एस.एम.हायस्कूलची पूर्वा माधव प्रभुदेसाई आणि सेंट उर्सुला स्कूलची आदिती खानोलकर ९७.८० टक्‍के गुण मिळवून पाचवी आली आहे.
दहावी परीक्षेसाठी तालुक्‍यातून १५०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर १५०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात १४९१ जण उत्तीर्ण झाले. तालुक्‍यात मुलींच्या टक्‍केवारी ९९.५७ टक्‍के तर मुलांची टक्‍केवारी ९८.६३ टक्‍के एवढी राहिली. तालुक्‍यातील २९ पैकी २३ माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्‍के लागला आहे.